Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedसावधान....ई-सीमचा वापर करताय? अशी घ्या काळजी

सावधान….ई-सीमचा वापर करताय? अशी घ्या काळजी

मुंबई | Nashik

सध्या अनेक मोबाईल कंपन्यांनी ई सिम सुविधा सुरू केली आहे.परंतु याद्वारे आर्थिक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर इ सिम धारकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे. त्यांच्या फसव्या फोनला बळी पडू नये. यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे करण्यात येत आहे.

- Advertisement -

सध्या बाजारात नवीन प्रकारचे फोन आले आहेत त्यामध्येच e -सिम किंवा embedded सिमकार्ड असते. हे e -सिमवाले फोन जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला physical सिमकार्डची गरज नसते व तुम्ही e -सिम activate करून पाहिजे ते मोबाईल नेटवर्क योग्य शुल्क भरून वापरू शकता. सध्या सायबर गुन्हेगार या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग विशेषतः ग्राहकांची आर्थिक फसवणूकीसाठी करत आहेत.

फसवणूक

सायबर गुन्हेगार #१२१ या airtel च्या नंबरवर स्वतःचा ई-मेल id हा ग्राहकांच्या नावाने अपडेट करतात व सदर ग्राहकाच्या नावाने e -सिमकार्ड issue करून घेतात. तसेच QR कोडचा वापर करून ते e -सिम activate करून घेतात. त्यानंतर त्या ग्राहकाला एक sms येतो व लिंक असते ज्यावर क्लिक केल्यास एक फॉर्म उघडतो व त्यात तुमची सर्व आर्थिक माहिती जसे की बँक खात्याचा नंबर क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर पिन नंबर सर्व विचारले जातात. सायबर भामटे त्यांच्या फोन मध्ये तुमच्या नावाचे e -सिम वापरून मग तुमची सर्व बँक खात्यातील रक्कम ट्रान्सफर करून तुमची फसवणूक करतात.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि,

१) कृपया गरज नसल्यास हे e -सिम activate करू नका .

२) कोणताही ई-मेल id तुमचा ई-मेल id म्हणून देऊ नका .

३)शक्यतो सोशल मीडियावर तुमचा मोबाईल फोन नंबर ठेवू नका .

४) जर तुम्हाला असे e -सिम बद्दल काही फोन आले, तर कृपया लगेच कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करून त्याची खातरजमा करून घ्या.

५) इंटरनेटवरील कोणत्याही फॉर्मवर तुमच्या बँक खात्याची माहिती डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर,पिन नंबर देऊ नका .

केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये.

असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या