Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedसावधान! आक्षेपार्ह कंटेन्ट पाहत असल्यास फेसबुक करणार कारवाई

सावधान! आक्षेपार्ह कंटेन्ट पाहत असल्यास फेसबुक करणार कारवाई

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

फेसबुकवर (Facebook) आक्षेपार्ह (Offensive), फेक कंटेन्ट (Fake content), हिंसक (Violent), द्वेषपूर्ण व्हिडीओ (Hateful video) पाहिला असल्यास अशा युजर्सला फेसबुकद्वारे इशारा देण्यात येत आहे. याबाबत नव्या फिचरच्या (New features) टेस्टिंगला फेसबुकने सुरुवात केली आहे…

- Advertisement -

एखादा व्यक्ती आक्षेपार्ह, फेक किंवा द्वेषपूर्ण कंटेंट (Harmful Extremist Content) पाहत असल्याचे समोर आल्यास, अशा युजर्सवर कारवाई केली जाऊ शकते twitter वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. साईटवर कट्टरता रोखण्यासाठी एका जागतिक दृष्टीकोनातून या फिचरचे टेस्टिंग सुरू करण्यात आले आहे.

हे टेस्टिंग फेसबुकवर अशा लोकांचे रिसर्च करत आहे जे लोक अतिरेकी कंटेंटशी जोडलेले आहेत किंवा त्यांच्या संपर्कात आहेत. फेसबुकने हिंसक आणि द्वेषपूर्ण गटांविरुद्ध, द्वेष निर्माण करणाऱ्यांविरुद्ध आपले नियम कठोर केले आहेत. फेसबुककडून असा कंटेंट पाहणारे, पसरवणाऱ्यांची अकाउंट डिलीट (Delete account) केली जातात.

- Advertisment -

ताज्या बातम्या