Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedअँपलची 'ही' सिरीज ठरली गेमचेंजर!

अँपलची ‘ही’ सिरीज ठरली गेमचेंजर!

नाशिक l Nashik (आकाश गोसावी)

अमेरिकन टेक कंपनी अँपल ही स्मार्टफोन्स विक्रीमध्ये अव्वल बनली आहे. अँपलने हे स्थान सॅमसंग आणि हवाई या कंपन्यांना मागे टाकून मिळवले. सद्य परिस्थिती पाहता सर्व कंपन्या मिडरेंज स्मार्टफोन्स वर आपले लक्ष केंद्रित करत असताना अँपलने आपला आयफोन-१२ ही सीरीज लाँच केली आणि हे अँपलसाठी गेमचेंजर ठरले.

- Advertisement -

मार्केट ट्रॅकर गार्टनर दिलेल्या रिपोर्टनुसार २०२० वर्षाच्या तृतीय चौथ्या तिमाहीमध्ये सॅमसंगच्या तुलनेत जास्त स्मार्टफोन विकले. या आधारे अँपलने अव्वल स्थान २०२१६ नंतर प्राप्त केले.

कंपनीने नुकतीच लाँच केलेली Iphone १२ सीरिज अ‍ॅपलसाठी गेमचेंजर ठरली. या सीरिजच्या स्मार्टफोनची जगभरात मोठ्या प्रमाणात विक्री झाली याचाच फायदा अ‍ॅपलला झाला, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यानुसार, २०२०च्या चौथ्या तिमाहीत अ‍ॅपलने ७९.९ मिलियन म्हणजे जवळपास ७.९ कोटी iPhone विकले, तर सॅमसंगने एकूण ६२.१ मिलियन म्हणजे जवळपास ६.२९ कोटी स्मार्टफोनची विक्री केली.

आयफोन १२ सीरिज लाँच होईपर्यंत सॅमसंग कंपनी अव्वल क्रमांकावर होती, पण आयफोन १२ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर सॅमसंगवर अ‍ॅपलने मात केली आणि पहिला क्रमांक गाठला, असं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. अ‍ॅपलने आपल्या या सीरिज मध्ये चार स्मार्टफोन्स लाँच केले असुन आयफोन १२प्रो सर्वात महागडा तर आयफोन १२ मिनी हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या