अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोर

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली – New Delhi

दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपल भारतातील आपले पहिले ऑनलाईन स्टोर उघडण्यास तयार आहे. कंपनी….

पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 2020 मध्ये भारतात आपल्या पहिल्या ऑनलाईन स्टोरचे उद्घाटन होऊ शकते. मागील वर्षी सरकारकडून भारतात 30 टक्के पाटर्स बनवल्यास करात सूट देण्याची घोषणा करण्यात आली होती. अॅपलचे हे पाऊल याचाच एक भाग आहे.

कंपनी आपले पहिले स्टोर याआधीच सुरू करणार होती, मात्र कोरोना व्हायरसच्या संकटामुळे विलंब झाला. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार कंपनी आपले ऑॅनलाईन स्टोरच्या ऑॅपरेशनला फेस्टिव्ह सीझन दसरा किंवा दिवाळीपर्यंत सुरू करण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे आयफोन विक्रीमध्ये वाढ होईल. ऑनलाईन स्टोर व्यतिरिक्त अॅपल भारतात आपले अधिकृत रिटेल स्टोर सुरु करण्याची देखील योजना बनवत आहे. कंपनी दोन स्टोरला एकसोबत सुरु करण्याची तयारी करत आहे. यातील पहिले स्टोर पुढील वर्षी मुंबईत आणि दुसरे स्टोर बंगळुरू उघडण्याची शक्यता आहे.

सध्या अॅपल भारतीय बाजारात आयफोन, आमॅक्स, मॅकबुक्स, एअरपॉड आणि अन्य प्रोडक्टसची थर्ट पार्टीद्वारे विक्री करतो. तर फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनद्वारे ऑनलाईन विक्री केली जाते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *