Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedअ‍ॅपल घेऊन येतय नवीन स्मार्ट वॉच; जाणून घ्या फिचर्स

अ‍ॅपल घेऊन येतय नवीन स्मार्ट वॉच; जाणून घ्या फिचर्स

मुंबई | Mumbai

अ‍ॅपल लवकरच आपले नवीन ‘अ‍ॅपल वॉच-7’ लाँच करणार आहे. या वॉच मध्ये काही नवीन फीचर्स अ‍ॅड केले जाणार आहेत. तसेच हे वॉच ‘हेल्थ सेंट्रिक’ असेल…

- Advertisement -

अ‍ॅपल वॉच-7 मध्ये बॉडी टेम्प्रेचर सेन्सर दिले जाईल. कंपनी या व्हर्जनमध्ये ब्लड शुगर सेन्सर देण्याचाही विचार करत आहे.

कंपनीने वॉचमध्ये हे दोन सेन्सर दिले तर ग्लूकोज लेव्हल आणि टेम्प्रेचर कळू शकेल. परंतु,ब्लड शुगर सेन्सर कंपनी एवढ्या लवकर देणार नसल्याचे कळले आहे. हे सेन्सर तयार करण्यासाठी आणखी काही वर्ष लागणार आहेत.

2022 मध्ये अ‍ॅपल वॉचमध्ये टेम्प्रेचर सेन्सर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अ‍ॅपलच्या नव्या वॉचमध्ये हेल्थ फिचरवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. डिझाईनमध्येदेखील थोडेफार बदल करण्यात येणार आहेत. वॉचच्या डिस्पेवरील बॉर्डर कमी करण्यात येईल. तसेच अल्ट्रा वाइडबँड फंक्शनदेखील दिले जाणार आहे.

वॉचच्या सध्याच्या व्हर्जनमध्ये ऑक्सिजन मॉनिटर, हार्ट रेट सेन्सर, ईसीजी सपोर्टदेखील देण्यात आला आहे. कोरोना काळात लोक आरोग्याबाबत जागरुक झाल्याने कंपन्यादेखील हेल्थ सेंट्रिक फिचर्स आणण्यावर भर देत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत बॉडी टेम्प्रेचर मोजण्याचे डिव्हाइस जवळ असणे ही काळाची गरज झाली आहे, त्यामुळे टेम्प्रेचर चेक करण्यासाठी या वॉचमध्ये कोणते ऑप्शन दिले जाईल, यावर सर्वत्र चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या