नवी दिल्ली | प्रतिनिधी

सर्वांनाच उत्सुकता लागून असलेल्या आयफोन 12 सिरीजचे अॅपलने अनावरण केले आहे. यात कंपनीकडून चार नवे मॉडेल बाजारात आणण्यात आले असून आज झालेल्या एका कार्यक्रमात घोषणा करण्यात आली आहे.

आयफोन 12 सिरीजच्या मोबाईलमध्ये 5G नेटवर्क चालू शकणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. आयफोनमध्ये 5जी नेटवर्क सुरू करत असून आयफोनसाठी नव्या युगाची सुरुवात असल्याचे मत अॅपलचे प्रमुख टिम कुक यांनी मांडले.

हे चार फोन झालेत आज लाँच

आयफोन 12 (64, 128 आणि 256 GB स्टोरेज)

आयफोन 12 मिनी (64, 128 आणि 256 GB स्टोरेज)

आयफोन 12 प्रो (128, 256 आणि 512 GB स्टोरेज)

आयफोन 12 प्रो मॅक्स (64, 128, 256 GB स्टोरेज)

किती असेल किंमत?

आयफोन 12 सिरीज - किंमत 70 हजार रुपयांपासून 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत

आयफोन 12 मिनी मोबाईलची किंमत भारतात 69 हजार 900 रुपये

256 GB चे मॉडेल 84 हजार 900 रुपये

512 GB स्टोरेजच्या आयफोन प्रो मॅक्सची किंमत 1 लाख 59 हजार 900 रुपये

आयफोन 12 मिनी 5जी तंत्रज्ञान वापरण्यात आलेला जगातील सर्वांत लहान फोन आहे.