अ‍ॅप
अ‍ॅप
गॅजेट

आता भारतीय अ‍ॅप जाेरात

चायनीज अ‍ॅपला लगामामुळे देशी अ‍ॅपचे डाऊनलाेडींग वाढले

Deshdoot Digital Team

केंद्र सरकारने चायनीज ५९ अ‍ॅप ब्लाॅक केले. त्यानंतर भारतीय अ‍ॅपची मागणी वाढली. व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप टिकटाकला ब्लॉक केल्यानंतर त्याचा जागी Roposo, Mitron आणि Chingari यासारखे अ‍ॅप्स आता डाऊनलोड केले जात आहे. चिंगारी आणि मित्रों अ‍ॅप गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल प्ले स्टोरवर टॉपवर पोहोचले आहेत. चिंगारी अ‍ॅप नाेव्हेंबर २०१८ मध्ये आले हाेते. गेल्या दहा दिवसांतच ५ लाख ५० हजार लाेकांनी हे अ‍ॅप डाऊनलाेड केल्याचे कंपनीचे सहसंस्थापक सुमित घाेष यांनी सांगितले.

चिंगारी अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोरवर सोशल नेटवर्किंग अ‍ॅप कॅटिगरीत नंबर वनवर दिसत आहे. याला ४.१ स्टार रेटिंग मिळाली आहे. प्ले स्टाेअरवर त्याचे रेटींग ४.५ झाले आहे रोज लाखो लोक डाऊनलोड करीत आहे.

मित्रों अ‍ॅपला अ‍ॅपल स्टोरच्या टॉप फ्री अ‍ॅप्सच्या सेक्शनमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. या अ‍ॅपला अ‍ॅप स्टोरवर ४.५ स्टार रेटिंग मिळाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com