सासरच्या अंगणातच केले महिला व तिच्या बाळाचे अंत्यसंस्कार!

0
चांदवड : न्हनावे येथील अर्चना ज्ञानेश्वर आहेर (25) या विवाहितेसह अवघ्या चार महिन्याचा मुलगा प्रणव याचा राहत्या घरात जळून मृत्यू झाल्याची घटना काल (दि.5) सकाळी 11.30 च्या सुमारास घडली.

दरम्यान, सदरचा प्रकार घातपात असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळी सासरची कुठलीही जबाबदार व्यक्ती हजर नसल्याने माहेरच्या नातेवाईकांचा रोष वाढला व सासरच्या मंडळींना घटनास्थळी बोलवा तरच अर्चना व प्रणवच्या मृतदेहाला हात लावा अशी भूमिका घेतल्याने परिसरात काही काळ तणाव होता.

तसेच पंचनाम्यासाठी स्थानिक नागरीक पुढे सरसावत नसल्याने चांदवडहून शासकिय पंचाना पाचारण करण्यात आले. अखेर तीन तासाने आई व मुलाचा मृतदेह चांदवड येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. दरम्यान शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा अर्चना व प्रणव यांच्यावर सासरच्या ओट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*