पिंपळगाव खांड धरणासाठी 2785 लाखांचा निधी

0
अकोले (प्रतिनिधी) – पिंपळगाव खांड धरणाच्या कामासाठी 2017 -18 साठी राज्य सरकारने 2785 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात केली आहे. अशी माहिती आ.वैभवराव पिचड यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल दुपारी विधी मंडळ अधिवेशनात दिली.
आ.पिचड यांनी निधीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यात त्यांनी पिंपळगाव खांड हे धरण निधीअभावी बंद असल्याचा ठपका सरकारवर ठेवला होता. दोन वर्षे हे धरण बंद आहे. त्याला सुधारीत प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिलेली नाही. यासाठी विलंबाची कारणे देवून या प्रश्नाबाबत दोन वर्षे सरकारने काय कार्यवाही केली आहे. असा सवाल केला होता.
या प्रश्नाला मंत्री महाजन यांनी उत्तर देताना धरण बंद असल्याचे अमान्य केले आहे. शिवाय 2016-17 या सालासाठीची 339.14 लाखाची तरतूद केली होती. मात्र आतापर्यंत या धरणासाठी 576.04 लाख रुपये निधी या धरणाला देय आहे. असे त्यांनी मान्य केले.तर मागील सर्व तूट भरून काढण्यासाठी यावर्षी 2785 लाख रुपयांची तरतूद केली अहे.असे आ.पिचड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी निदर्शंनास आणून दिले.

 

LEAVE A REPLY

*