निधी योजनेचा प्रशिक्षणावर जास्त खर्च : डॉ. थिल्लाकन

0
समशेरपूर (वार्ताहर) – मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेचा प्रशिक्षणावर जास्त तर प्रत्यक्ष फिल्डवर कमी खर्च झाला असल्याचे केंद्रीय कमेटी ग्रामीण मॅनेजमेंट नवी दिल्लीचे प्रतिनिधी केंद्रिय निरीक्षक डॉ. टी. व्ही. थिल्लाकन यांनी सांगितले.
समशेरपूर येथे मागास क्षेत्र अनुदान निधी योजनांची पाहणी करण्यासाठी आले असता ते बोलत होते. डॉ. थिल्लाकन यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. मागास क्षेत्राचा विकास होण्यासाठी, केंद्र शासनाने, मागास क्षेत्र अनुदान निधी योजना अंतर्गत निधी देऊन अपुरी विकास कामे पूर्ण करण्यासाठी निधी दिला होता. त्याची अंमलबजावणी कशी झाली. योजनेचे फलीत योग्य की अयोग्य, याबाबतच्या मूल्यांकनास थिल्लाकन आले होते. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, अकोले, नगर हे तीन तालुके तसेच देवळाली व नगर या दोन पालिकांची त्यांनी पाहणी केली.
अकोले तालुक्यातील इंदोरी, विठा, समशेरपूर या ग्रामपंचायतींच्या विकास कामांची पाहणी करून त्यांनी योजनांबद्दल माहिती सांगितली. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी, ग्रामीण विकास अधिकारी के. जी. साळवे, अकोले तालुका समन्वय पेसा अधिकारी बन्यबापू सहाणे, ग्रामविकास अधिकारी आर. के. वर्पे, उपसरपंच सचिन दराडे, मा. सरपंच पुणाजी मेंगाळ, दत्तू माळी, विलास भरीतकर, कासम मणियार व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

.

LEAVE A REPLY

*