Type to search

टेक्नोदूत

सांडपाण्यापासून इंधननिर्मिती

Share

सध्या पारंपरिक इंधनाला अनेक पर्याय शोधले जात आहेत. त्यामध्ये बायोफ्युएलचाही पर्याय आहे. यामध्येही वेगवेगळे संशोधन सध्या होत आहे. आता संशोधकांनी एक असा जीवाणू शोधला आहे जो प्रकाशापासून ऊर्जा एकत्र करू शकतो. निळ्या-जांभळ्या रंगाचा हा जीवाणू सांडपाण्यापासून हायड्रोजन इंधन तयार करण्यासाठी मदत करू शकतो.

हा जीवाणू एखाद्या टाकाऊ कार्बनिक पदार्थापासून कार्बनही बाजूला करू शकतो. घरगुती सीवेज आणि कारखान्यांपासून निघालेल्या सांडपाण्यातील कार्बनिक ऊर्जा, बायोप्लास्टिक आणि अगदी पशू आहारही बनवता येऊ शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. फ्रंटियर्स इन एनर्जी रिसर्च नावाच्या नियतकालिकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की या नव्या निळ्या फोटोट्रोफिक बॅक्टेरियाला इलेक्ट्रिक शॉक देऊन कोणत्याही कार्बनिक पदार्थापासून 100 टक्के कार्बन पुन्हा मिळवता येऊ शकतो. अर्थात वीज उत्पादनावेळी हायड्रोजन वायूही उत्पन्न होतो. स्पेनच्या किंग जुआन कार्लोस युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!