Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

महागाई, इंधन दरवाढीचा फ्रान्समध्ये भडका; पॅरिसमध्ये हिंसाचार, जाळपोळ

Share

पॅरिस (फ्रान्स) : वाढती महागाई आणि पेट्रोल दरवाढीने फ्रान्समध्ये भयंकर हिंसाचार उफाळला असून सरकार आणीबाणी लादण्याचा विचार करत  आहे. दशकातील सर्वात मोठा हिंसाचार फ्रान्समध्ये उफाळला आहे. सरकारची आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी असली, तरी आणीबाणीचा विचार बाजूला ठेवला नसल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

फ्रान्समधील महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आंदोलक पिवळय़ा रंगाचे जाकीट घालून आंदोलन करीत आहेत. त्यावरून या आंदोलनाला ‘यलोवेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे. त्या आंदोलनाला शनिवारपासून हिंसक वळण लागले आहे. मात्र या जनआंदोलनाचे वैशिष्टय़ म्हणजे, त्याला नेतृत्वाचा चेहराच नाही. त्यामुळे ‘आगडोंब’ शमवायला चर्चा करायची तरी कोणाशी, असा प्रश्न पडल्याने सरकार बुचकळय़ात पडले आहे.

संपूर्ण फ्रान्समध्ये हिंसाचार पसरला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कोणती कृती करता येईल याबाबत विचार करावा लागेल, असे सरकार प्रवक्ते बेंजामिन ग्रीव्हॉक्स यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४०० लोकांना अटक करण्यात आली असून १३३ जखमी आहेत. यामध्ये सुरक्षा दलातील २३ जणांचा समावेश आहे.

आंदोलनाचा पसरत चाललेला वणवा विझविण्यासाठी आणि दंगलखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणती पावले उचलावीत यावर इमॅन्युअल मॅक्रोन, पंतप्रधान एडवर्ड फिलिप आणि गृहमंत्री क्रिस्टोर्फ कॅस्टनर यांनी एक बैठक घेतली. फ्रान्समध्ये शनिवारी 36 हजारांहून अधिक आंदोलकांचा सहभाग होता. त्याआधी पहिल्या आठवड्यात 1 लाख 13 हजार लोक, तर दुसऱ्या आठवडय़ात 53 हजार लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!