Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

इंधन दरवाढीबाबत भाजपाने हात झटकले

Share
नवी दिल्ली: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसनं ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण देशभरात या बंदचा परिणाम दिसू लागल्यानंतर भाजपाचे नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणं आमच्या हातात नाही, असं म्हणत रवीशंकर प्रसाद यांनी हात वर केले.

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, जनतेने मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. २१ विरोधी पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. दरम्यान भाजपचे मंत्र्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भाजपा कायम देशातील जनतेसोबत आहेत. देशातील जनतेला होत असलेल्या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. मात्र इंधनाचे दर आमच्या हातात नाही, असं म्हणत रवीशंकर प्रसाद यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याबद्दल असमर्थतता दर्शवली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!