Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशकात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी इंधन मर्यादा; जाणून घ्या सविस्तर

Share

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी नाशिक लाॅकडाऊन असले तरी नागरिक त्यास प्रतिसाद देत नसून वाहन घेऊन बाहेर पडत आहे. ते बघता जिल्हाप्रशासनाने दुचाकीला दिवसाला शंभर तर चारचाकी वाहनासाठी हजार रुपयांचे इंधन भरता येईल असे निर्बंध घातले  आहेत.  याबाबत  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेश जारी केले असून पेट्रोल पंप धारकांना त्याची अंमलबजावणी सक्तिची असणार आहे.

नाशिकमध्ये करोनाचा एकही रुग्ण नसला तरी जिल्हा प्रशासन सतर्क आहे. लाॅक डाऊनची अंमलबजावणीसाठि सर्व यंत्रणा काम करत आहे.  संचारबंदी लागू असतानाही नागरीक याबाबत गांभीर्य नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सोमवारी शहरातील रस्त्यांवर नागरिकांनी गर्दी केली होती.

आवश्यकता नसताना नागरिक वाहन घेउन बाहेर पडत आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका वाढला आहे. वाहनाना अटकाव घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने इंधन निर्बंध लागू केले आहे.

दुचाकिसाकी शंभर तर चारचाकी वाहनचालक दिवसाला हजार रुपयाचे इंधन भरू शकतात. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी पेट्रोलपंप चालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी बैठक घेऊन हे आदेश जारी केले.

तसेच एक वाहन एका पेक्षा जादा पेट्रोलपंपावर इंधन भरु शकते ही शक्यता लक्षात घेता वाहन ट्रेस सिस्टिमद्वारे वाॅच ठेवला जाणार आहे. दरम्यान सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेतच पेट्रोलपंप सुरु राहणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!