#FU: ‘झी’ समूहाचा ‘एफयू’ची प्रसिद्धी न करण्याचा निर्णय!

0

‘एफयू’ (फ्रेंडशीप अनलिमिटेड) हा महेश मांजरेकर निर्मित, दिग्दर्शित चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘सैराट’फेम आकाश ठोसरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला सध्या खुद्द बॉलीवुड अभिनेता सलमान खान याची भक्कम साथ मिळाली आहे.

मात्र हा चित्रपट ‘झी स्टुडिओ’ने वितरणासाठी घ्यावा, यासाठी मांजरेकर प्रयत्नशील होते. ‘एफयू’ हा संगीतप्रधान चित्रपट असल्याने यात तब्बल १४ गाणी आहेत. या चित्रपटासंदर्भात महेश मांजरेकर आणि ‘झी स्टुडिओ’ यांच्यात मतभेद झाल्याने हा चित्रपट करण्यास त्यांनी नकार दिला.

अखेर मांजरेकरांनी ‘टी सीरीज’ कंपनीला या चित्रपटाचे हक्क विकले. या वादामुळेच ‘एफयू’ची जाहिरात किंवा प्रसिद्धी ‘झी’च्या कोणत्याच व्यासपीठावरून केली जात नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यासंदर्भात बोलताना, सध्या मराठी चित्रपटांना योग्य ती प्रसिद्धी मिळवून देण्यात ‘झी स्टुडिओ’चाच हातखंडा आहे.त्यामुळे त्यांनी ‘एफयू’ केला असता तर आनंद झाला असता. पण ‘झी’ने त्यांच्या वाहिनीवरून या चित्रपटाची जाहिरात किंवा प्रसिद्धी करण्यावरही र्निबध घालण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याबद्दल वाईट वाटते. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो, अशी भावना महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*