थंडीमुळे फळपिकांच्या नुकसानीची भरपाई

0

नगर जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी अन् संत्राचा समावेश, शेतकर्‍यांना दिलासा

मुंबई – राज्यात निवडक फळपिकांसाठी हवामानावर आधारित विमा योजना राबवण्यात येणार आहे. पंतप्रधान फळपीक विमा योजना या अंतर्गत फळपिक विमा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या योजनेत शासनाने निर्देशित केलेल्या हवामान केंद्रात नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकर्‍यांना परस्पर नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मागील दोन महिन्यांत काही ठिकाणी तापमान खूप खाली गेले होते. त्यामुळे काही पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. या परिस्थितीत फळपीकनिहाय तापमान ठराविक मर्यादेच्या कमी झाल्यास त्या फळपिकासाठी निश्चित करण्यात आलेल्या हवामानाच्या धोक्यानुसार शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.नगर जिल्ह्यात यंदा विक्रमी थंडी राहिलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

आंबा- अहमदनगरया जिल्ह्यांसाठी * पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी – 1 जानेवारी 2019 ते 28 फेब्रुवारी 2019
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) – सलग तीन दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास- प्रती हेक्टर – 36,300 रुपये

थंडी नुकसानग्रस्तांना दिलासा, पिकांवर कमी तापमानाचे निश्चित केलेले ट्रिगर आणि नुकसान भरपाई रक्कम पुढीलप्रमाणे

द्राक्ष- अहमदनगर या जिल्ह्यांसाठी. पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी – 1 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019
दैनंदिन तापमान 3.51 डिग्री सेल्सियस ते 4.00 सेल्सियस दरम्यान नोंदले गेल्यास प्रती हेक्टर – 9,900 रुपये
3.01 ते 3.50 डिग्री सेल्सियस असल्यास- प्रती हेक्टर 14850 रुपये
2.51 ते 3.00 डिग्री सेल्सियस असल्यास- प्रती हेक्टर- 19800 रुपये
2.01 ते 2.50 डिग्री सेल्सियस असल्यास प्रती हेक्टर 29,700 रुपये
2 डिग्री सेल्सियस पेक्षी कमी नोंदलो गेल्यास- प्रती हेक्टर- 49,500 रुपये

डाळिंब- पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी – 1 डिसेंबर 2018 ते 31 जानेवारी 2019
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सियसमध्ये) – सलग दोन दिवस 10 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास- विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर – 18150 रुपये

संत्रा- फळपिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी – 16 जानेवारी 2019 ते फेब्रुवारी 2019
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) – सलग तीन दिवस 12 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास-विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर – 19,250 रुपये

केळी- पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी – 1 नोव्हेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सियसमध्ये) – सलग तीन दिवस 8 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास- विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर – 33,000 रुपये

 

LEAVE A REPLY

*