Type to search

Featured सार्वमत

फळबाग विमा लवकरच जमा होणार

Share

शिर्डी (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यातील पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 18 हजार शेतकर्‍यांनी फळबागांच्या विम्याचे हप्ते भरलेले आहेत. मात्र अजूनही एकही शेतकर्‍याला विम्याचा लाभ मिळालेला नाही. यासाठी खा. सदाशिव लोखंडे यांनी सातत्याने दिल्ली दरबारी प्रयत्न केले. त्याला यश आले असून लवकरच विम्याचे पैसे जिल्हा बँकेत जमा करण्याचे आदेश केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिले आहेत.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर व सचिव डॉ. आशिषकुमार भुताणी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी केंद्रीय मंत्री तोमर यांनी हे आदेश दिले.
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत डाळिंब, चिकू, संत्री, मोसंबी, रामफळ, पेरू अशा फळबागांचा 17 हजार 975 शेतकर्‍यांनी 12 हजार 832 हेक्टरचा विमा भरलेला आहे. या विम्याच्या हफ्त्यापोटी सात कोटी 55 लाख रुपये भरलेले आहेत. यातून विम्याची 151 कोटी 12 लाख रुपये मिळणे अपेक्षित आहेत.

यापूर्वीही जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर व बँकेचे व्यवस्थापक रावसाहेब वर्पे, विनायक वाघ यांना सोबत घेऊन खा. सदाशिव लोखंडे यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शेतकरी साहाय्यता निधीचे सचिव डॉ. आशिषकुमार भुताणी यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत फळबागधारकांचा पीक विमा लवकरच जमा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन डॉ. भुताणी यांनी दिले होते. त्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री तोमर व सचिवांनी पीक विमा जमा करण्याचे आदेश संबध विभागाला दिले.

जिल्ह्यातील एकाही फळबागधारक शेतकर्‍याला पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2018-19 अंतर्गत लाभ मिळालेला नाही. या योजनेअंतर्गत 17 हजार 975 शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेमार्फत एसबीआय जनरल इन्शुरन्स प्रा. लि., कंपनीकडे विम्याचे हप्ते भरले आहेत. नगर जिल्ह्यातील बहुतांशी फळबागा या पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र 2018-19 च्या पावसाळी हंगामात पावसाने ओढ दिल्याने फळबागांमधून उत्पन्न तर मिळालेच नाही शिवाय, फळबागा वाचविण्याचे संकट शेतकर्‍यांवर येऊन ठेपले आहे. पाण्याअभावी अनेक बागा जळून खाक झाल्या आहेत. यात शेतकर्‍यांना विम्याची रक्कम मिळाली असती तर, नक्कीच विकत पाणी घेऊन संबधित बागा जगविता आल्या असत्या. हीच कैफीयत खा. लोखंडे यांनी केंद्रीय मंत्री तोमर यांच्यापुढे मांडली. यावर तोमर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबधित विमा कंपनीला लवकरच पीक विमा जमा करण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले.

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत डाळिंब, चिकू, संत्री, मोसंबी, रामफळ, पेरू अशा फळबागांचा 17 हजार 975 शेतकर्‍यांनी 12 हजार 832 हेक्टरचा विमा भरलेला आहे. या विम्याच्या हफ्त्यापोटी 755 लाख रुपये भरलेले आहेत. यातून विम्याची 15,112 लाख रुपये मिळणे अपेक्षित आहेत. मात्र एसबीआय इंशुरन्स कंपनीकडून एक रुपयाही शेतकर्‍यांना मिळालेला नाही. याबाबत शेतकर्‍यांनी अनेकदा आपली कैफीयत खा. सदाशिव लोखंडे यांच्याकडे मांडली. यावर जिल्हा बँकेला खा. लोखंडे यांनी अनेकदा विचारणा केली. मात्र आपल्या हातात काहीच नसल्याचे जिल्हा बँकेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. यानंतर याच पदाधिकार्‍यांना घेऊन खा. लोखंडे यांनी दिल्लीतील संबधित अधिकार्‍यांच्या भेटी घेतली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!