Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

लाखोंचा गफला करणार्‍या श्रीरामपूरच्या अध्यक्षाला बचत प्रतिनिधींनी कोल्हारमध्ये पकडले

Share

दोन दिवसांची पोलीस कोठडी || राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या

राहाता (तालुका प्रतिनिधी)- साकुरी येथील साईदत्त अर्बन मल्टिपल निधी पतसंस्थेत 33 लाख पन्नास हजारांचा अपहार करून पसार झालेल्या संस्थेच्या अध्यक्षाला ठेवीदार, व खातेदारांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अद्याप सहा साथीदार गायब आहेत.

साकुरी येथील साईदत्त अर्बन या संस्थेचा चेअरमन नितीन सुरेश थोरात (वय 44), सुरेश नाथाजी थोरात, सुमन थोरात, मनीषा थोरात, सतीश जाधव, अनिल जाधव, केशव जाधव (सर्व राहणार पुणतांबा) यांनी ऑक्टोबर 2018 ते एप्रिल 2019 या काळात साकुरी येथे संस्था स्थापन करून नागरिकांना जादा पैशाचे आमिष दाखवून लाखो रुपये जमा केले. खातेदार व ठेवीदार यांच्या पैशांचा अपहार करून फसवणूक केली. तसेच अध्यक्ष थोरात येथून पळून गेला. याप्रकरणी ठेवीदार व खातेदारांनी राहाता पोलीस ठाण्यात 19 ऑगस्ट रोजी वरील सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र 20 दिवसांनंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तसेच तपास करण्यास टाळाटाळ केली.

ज्या नागरिकांचे लाखो रुपये या संस्थेत अडकले त्यांनी दैनिक बचत ठेव करणार्‍या प्रतिनिधींमागे पैसे द्या याचा ससेमिरा लावला. त्यांना घराबाहेर पडणेेही मुश्कील झाले होते. या सर्व तरुण बचत प्रतिनिधींनी सर्वांची फसवणूक करणारा आरोपी नितीन थोरात याचा छडा लावून त्याला पकडायचे, असे ठरविले. एवढेच नव्हेतर हे सर्वजण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मागावर होते. अखेर त्याचा सोमवारी आरोपी हा कोल्हारमध्ये असल्याची माहीती मिळताच सर्वांनी जाऊन त्याला पकडून राहात्याला आणले व राहाता पोलीसांच्या हवाली केले. पोलीसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

नितीन थोरात याने कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यात अशा संस्था स्थापन करून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक केली आहे. या संस्थेत त्याच्याच कुटूंबातील सर्व सदस्य संचालक व सभासद म्हणून संस्थेत आहेत. मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा करायच्या यासाठी गरीब कॉलेजचे विद्यार्थी हेरायचे व त्यांना दैनिक बचत ठेवी गोळा करण्याचे काम देऊन हा हे रँकेट चालवत होता. हा सर्व प्रकार अनेक महिन्यापूर्वी घडूनही तक्रार दाखल करायला टाळाटाळ केली जात होती. सहकार विभागाचे अशा संस्थांवर नजर असताना अशा घटना घडल्या जात आहे. यात सहकार विभागाचे काही अधिकारी सामील असावेत, त्यांचीही चौकशी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. या गुन्ह्याचा तपास नुकतेच नव्याने बदलून आलेले पोलीस निरीक्षक एस. डी. भोईटे यांनी स्वतःकडे घेतला असून इतर पसार आरोपींना अटक करून गोरगरीबांचे अडकलेले लाखो रूपये मिळवून द्यावे अशी मागणी राहाता, साकुरी परिसरातील फसवणूक झालेल्या नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!