Friday, April 26, 2024
Homeनगरनोकरीच्या आमिषाने दोघांची 24 लाखांची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने दोघांची 24 लाखांची फसवणूक

‘रोहिदासजी’च्या विश्वस्तांविरुद्ध आणखी दोन गुन्हे

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांची 24 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद देण्यात आली आहे. आता यापर्यंत रोहिदासजीच्या विश्वस्तांविरुद्ध फसवणुकीचे एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे, संस्थेचे सदस्य संजय बन्सी साळवे, रेखा संजय साळवे (सर्व रा. आलमगीर रोड, विजयनगर, भिंगार), सचिव अनिल तुळशीदास शिंदे, उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे (दोघे रा. इंदिरानगर, श्रीरामपूर), राजू बन्सी साळवे (रा. खांडगाव, ता. पाथर्डी) यांचा समावेश आहे.

याबाबत माहिती अशी की, सद्गुरू रोहिदासजी ग्रामिण प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी धनंजय विश्वासराव वांढेकर (रा. वाघोली, ता. शेवगाव) यांची सह.शिक्षक पदासाठी मुलाखत घेतली. तात्पुरता आदेश देऊन पगार वेळेवर देण्याची बतावणी केली. त्यांच्याकडून घेतलेली रक्कम व पगारा पोटी बुडवलेली रक्कम अशी 21 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केली.

सचिन रावसाहेब भिसे (रा. कामतशिंगवे, मिरी ता. पाथर्डी) यांच्याकडून लिपिक पदासाठी पाच लाख रुपये घेतले. त्यातील अडीच लाख रुपये परत दिले. उर्वरित अडीच लाख रुपयांची रक्कम व पगार न देता आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत या विश्वस्तांविरुद्ध सात गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या