1 जूनपासून शेतकरी संप होणारच

0
अफवांवर विश्‍वास ठेवू नका : घनवट
अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकरी संपावर जाण्यासाठी सरकारने काही ठराविक लोकांशी बोलणी करुन संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. विराधी नेते मतांसाठी तर सरकार स्थिर राहण्यासाठी आटापिटा करीत आहे. त्यात शेतकर्‍याचे मरण होत आहे.
त्यामुळे सकारच्या कोणत्याही अश्‍वासनांना किंवा विरोधकांच्या दुटप्पी धोरणाला न जुमानता शेतकरी संघटना 1 जून रोजी रस्त्यावर उतरुन बेमुदत संप यशस्वी घडवून आणणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी दूध व भाजीपाल्याची गावाबाहेर विक्री करू नये. या आंदोलनास सर्वांनी पाठिंबा द्यावा असे अवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत केले.
1 जून 2017 पासून सुरू होणार्‍या संपामध्ये शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे. किसान क्रांती या नावाने सुरू होणार्‍या या मागण्या यात जरी मतभेद असले तरी अन्यायाविरुद्ध लढायला तयार झालेल्या शेतकर्‍यांच्या बरोबर शेतकरी संघटना राहणार आहे.
संपूर्ण कर्जमुक्ती हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे इतर सर्व मतभेद बाजुला ठेवून सर्वांना संप यशस्वी करण्यास सहभाग घेतला पाहीजे. संपात फूट पाडण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन प्रयत्न केला आहे. याचा आम्ही निषेध करतो.
शेतकर्‍यांनी संप स्थगित केल्याच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये. 1 जुन पासून दूध, भाजीपाला व शेतीमाल विक्रीस घेऊन जाऊ नये असे घनवट म्हणाले. यावेळी अनिल चव्हाण सीमा नराडे, कारभारी कणसे, लालासाहेब सुद्रीक, विक्रम शेळके, सचिन चोभे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर शेतकरी क्रातिकारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ घोरपडे यांनी या संपास पाठिबा देऊन दूध व भाजीपाला गावाबाहेर जाऊ देणार नाही असे अश्‍वासन दिले आहे.

 

कर्ज माफी नको, शेतकर्‍यांना मुक्त करा
शेतकरी राजा सक्षम आहे. मात्र सरकारने काही गोष्टींतून त्याला मुक्त केले पाहिजे. 10 वर्षे वसुली बंद करावी, शेतकर्‍यांना व्यवसाय खुले करावे, राज्यबंदी, आयात निर्यात यावरील निर्बंध काढावे. अन्य देशातील तंत्रज्ञानाचा वापर करता येईल अशा उपायोजना कराव्यात, जीएमचे बियाणे वापरण्याची परवानगी द्यावी, शेतमालावाठी गोडावून, शेतापर्यंत रस्ता, 24 तास वीज, सबसिडी अशा सुविधा दिल्यास कर्ज फेडण्यास बळीराजा सक्षम आहे. असे झाल्यास व्याज नाही तर किमान तुमची मुद्दल तरी चुकती करू. मात्र शेतकरी साधा शेतीचा सुद्धा मालक राहिला नाही. हे शेतकर्‍याचे दुर्दैव आहे.

LEAVE A REPLY

*