Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedबारामतीहून धुळ्यासाठी सॅनिटायझर

बारामतीहून धुळ्यासाठी सॅनिटायझर

आ.रोहित पवारांनी दिला मदतीचा हात, जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द

धुळे  – 

कोरोना विषाणूशी दोनहात करण्यासाठी थेट बारातीनेही धुळ्याला मदतीचा हात पुढे केला असून 500 लिटर सॅनिटायझर पाठवले आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी हे प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्याकडे सुपूर्द केले.

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात रहाणे आणि खबरदारी पाळणे एकमेव उपाय आहे. मात्र कामासाठी घराबाहेर पडल्यास करोनाचा संसर्ग टाळावा यासाठी सॅनिटायझर सर्वात उत्तम उपाय आहे. सध्या सॅनिटायझरचा तुटवडा जाणवतो आहे व सध्या सर्वत्र सॅनिटायझरचा काळाबाजारही सुरु झाल्याची चर्चा आहे. असे असतांना धुळेकरांसाठी थेट बारामतीने मदतीचा हात दिला आहे.

कर्जतजामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आ.रोहित पवार आणि बारामती ऍग्रो लिमिटेडच्या वतीने 500 लिटर सॅनिटायझर उपलब्ध झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सॅनिटायझर उपलब्ध झाले आहेत.

राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष कैलास चौधरी व प्रदेश सचिव ईर्शाद जहागीरदार यांनी हे 500 लिटर सॅनिटायझर प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्यामार्फत प्रशासनाकडेे सुपूर्द करण्यात आलेे. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, कुणाल पवार, सरोज कदम, जया साळुंके, जमीर शेख, शकिला मेहमूद बक्ष, सुमित पवार आदींची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या