Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव : चेष्टा मस्करीतून मित्राकडून मित्राचा खून

Share

नाशिक | प्रतिनिधी

मद्यपान केल्यानंतर दोन मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ चेष्टामस्करीतून एकाचा खून झाला आहे. या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी एकतानगर, पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळील डी. के. गार्डनजवळ, मालेगाव येथे दोघा मित्रांची कामावरून सुटी झाल्यानंतर त्यांनी मद्य प्राशन करण्यासाठी दोघे मित्र एकत्र आले.

दरम्यान, दोघेही मद्यप्राशन करत असताना त्यांच्यात चेष्टामस्करी सुरू झाली. चेष्टामस्करीचे पर्यवसान भांडण व हाणामारीत झाले. यावेळी मिथुन कल्लू यादव (रा. एकतानगर, पिंपळेश्वर) याने रागाच्या भरात किचनमध्ये जाऊन चाकू हातात घेतला. तो चाकू रामसिंग तिलकराम गौतम (वय 24) याच्या छातीत खुपसला.

या घटनेत रामसिंग गौतम मयत झाला. या प्रकरणी बाबूलाल गुरुचरण भारती (धंदा मजुरी, टाईल्स फिटिंग, रा. कदमपूर, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम एकतानगर) यांनी फिर्याद दिली असून, मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात मिथुन कल्लू यादव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!