Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशMali Airstrike : फ्रान्सची दहशतवादाविरोधात मोठी कारवाई

Mali Airstrike : फ्रान्सची दहशतवादाविरोधात मोठी कारवाई

दिल्ली । Delhi

फ्रान्सने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई कारवाई केली आहे. फ्रान्सने मालीमध्ये केलेल्या एका हवाई हल्ल्यात अल-कायदा या या दहशतवादी संघटनेच्या 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची बातमी फ्रान्स सरकारने दिली आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यापासून याच क्षेत्रात ही मोहिम हातात घेण्यात आली होती. संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालीमध्ये 30 ऑक्टोबरला आमच्या जवानांनी 50 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पार्ली यांनी सैन्याच्या या कामगिरीला सलाम करत त्यांचे आभारही मानले. फ्रान्सच्या रक्षामंत्र्यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली.

गेल्या महिन्यात घडलेल्या दोन दहशतवादी घटनांनी फ्रान्स हादरुन गेले होते. मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्राच्या प्रकरणावरुन फ्रान्समध्ये 16 ऑक्टोबर रोजी मिडल स्कूलच्या शिक्षकाला रशियातील चेचन्या वंशाच्या एका 18 वर्षीय मुस्लिम युवकाने ठार मारले होते. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी पुन्हा अशाच प्रकारच्य़ा एका हल्ल्यात ट्युनिशियाच्या 21 वर्षीय युवकाने नीस शहरातील एका चर्चच्या बाहेर तीन लोकांची हत्या केली होती. त्यानंतर तीन दिवसांनंतर ल्योन शहरातील एका चर्चच्या बाहेर झालेल्या एका गोळीबारात ग्रीक ऑर्थोडॉक्स पुजारी गंभीर जखमी झाला होता. व्हिएन्नामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही फ्रान्समध्ये झालेल्या हल्ल्याचा संदर्भ असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या