महागाई भत्त्यात कपातीऐवजी बुलेट ट्रेनला स्थगिती का नाही? – राहुल गांधी

jalgaon-digital
1 Min Read

सार्वमत

नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा लाखो-कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प स्थगित का केला नाही? असा प्रश्न विचारत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘हा’ निर्णय असंवेदनशील आणि अमानवीय असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ते म्हणाले, कोट्यवधी रुपयांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणि केंद्रीय व्हिस्टा सौंदर्यकरण परियोजना यांसारख्या योजनांना स्थगिती देण्याऐवजी करोनाशी सातत्याने लढणार्‍या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशाच्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करणं हा सरकारचा असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे.

दरम्यान करोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारनं जास्तीच्या खर्चाला कात्री लावण्याबरोबरच केंद्र सरकारच्या अखत्यारित येणार्‍या कर्मचार्‍यांचा अतिरिक्त महागाई भत्त्याचा हफ्ता तूर्तास थांबवला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं याबाबत माहिती दिली.

1 जानेवारीपासून केंद्रीय कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यापोटी देय असलेला अतिरिक्त हफ्ता त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारकांना महागाईपोटी दिला जाणार्‍या भत्त्याचा अतिरिक्त हफ्ता दिला जाणार नाही. तसेच 1 जुलै 2020 पासून ते 1 जानेवारी 2020 पर्यंतचे महागाई भत्त्याचे अतिरिक्त हफ्ते दिले जाणार नाही, असा निर्णय अर्थमंत्रालयाने दिला. याच निर्णयावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांचं हे ट्विट प्रियंका गांधी यांनीही रिट्विट केलं आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *