‘नांव झाल पाहिजे’ नाटकातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रकाश

0

नाशिक | दि.२२ प्रतिनिधी(प्रसाद जगताप)

नाटक, चित्रपट या माध्यमांतून कलाकार आपली कला जिवंत ठेवत असतो. मात्र, ज्यावेळी कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा घातली  गेल्यावर घडणारा नाट्यमय संघर्ष म्हणजे ‘नाव झाल पाहिजे’ हे नाटक होय.

परशुराम सायखेडकर येथे ५७वी राज्य हौशी नाट्य स्पर्धेत बुधवारी (दि.२२) रोजी बाॅश फाईन आर्ट्स प्रस्तूत, लेखक विद्यासागर अध्यापक व दिग्दर्शक प्रशांत हिरे यांनी नाव झाल पाहिजे या नाटकाचे सादरीकरन करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून चित्रपट व नाटक यांवर धर्मिक भावना दुखावल्या जातील यामुळे कलाकाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येणारी गदा ह्याच पार्श्वभूमीवर हे नाटक सादर करण्यात आले.

एेतिहासिक घटनेवर नाटक सुरु असते. नाटकाचा प्रयोग सुरु असताना एक छोटी संघटना सदर नाटकात आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असे सांगत नाटक जबरदस्तीने बंद पडते. यात पोलीस मध्यस्थी करतात मात्र यावेळी फक्त चर्चा होते. अखेर पर्यंत नाटकात कोणत्या धर्मिक भावना दुखावल्या हे कलाकारांना कळत नाही. शेवटी सर्व अर्धवट राहते.

या नाटकात राजेश अभोणकर, अंबर कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, सुमित जाधव, माधुरी पेठे, प्रशांत येवले, प्रवीण चव्हाण, धनंजय रहाणे, अभिषेक कोते, सुधीर पोंदे, शिरीष तांदळे, स्वप्नील क्षीरसागर, स्नेहा ओक, ऋतुजा वाबळे, प्रमोद भालेराव,. नेपथ्य संजय चौधरी/प्रशांत येवले, पार्श्वसंगीत रोहित सरोद,  प्रकाश योजना रवींद्र रहाणे, रंगभूमी माणिक कानडे, वेशभूषा विशाल बोढरे आदी कलाकारांचा समावेश होता.

 

 

LEAVE A REPLY

*