Friday, May 3, 2024
Homeनाशिक55 कोटी नागरिकांचे मोफत लसीकरण

55 कोटी नागरिकांचे मोफत लसीकरण

कळवण | प्रतिनिधी | Kalvan

केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली करोना (Corona) माहमारीच्या संकटात मोठे काम उभे केले असून देशातील 55 कोटी पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण (Vaccination) केले आहे…

- Advertisement -

भारत (India) देश हा असे काम करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे. सामान्य महिलांना उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून त्यांनी न्याय दिला आहे.

शेतकर्‍यांना किसान सन्मान योजना लागू केली. कष्टकरी, शेतकरी, कामगार यांचेही प्रश्न सोडविण्यासाठी माझ्यासारख्या आदिवासी समाजातील अनेक कार्यकर्त्यांना संधी दिल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केले.

पालघर ते नंदुरबार जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) आटोपून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार ह्या कळवण तालुका दौर्‍यावर आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या की, देशातील आठ आदिवासी समाजातील खासदारांना मंत्रिपदाची संधी देऊन पंतप्रधानांनी आदिवासी, कष्टकर्‍यांच्या सन्मान करीत त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक काम केंद्र सरकारने (Central Government) केले आहे.

कळवणकरांनी केलेल्या स्वागत बघून भावुक होत तुमच्या कष्ठामुळेच मी आज खासदारची मंत्री झाले आहे. हा स्वागत सोहळा बघण्यासाठी आज स्व. दादासाहेब (सासरे ए.टी.पवार) आज आपल्यात हवे होते अशी भावुक उदगारही त्यांनी काढले.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयच नव्हे तर इतर सर्वच खात्याकडे असलेली आपल्या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहिल, असे आश्वासन त्यांनी दिले. कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंत्री डॉ. भारती पवार यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हा नेते सुधाकर पगार, नंदकुमार खैरनार, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, महिला अध्यक्ष सोनाली जाधव, गोविंद कोठावदे, विकास देशमुख, सचिन सोनवणे, दिपक वेढणे, सतीश पगार, हितेंद्र पगार, प्रविण रौंदळ, हेमंत रावले, चेतन निकम, अमित देवरे, विश्वास पाटील, एस. के. पगार, बेबीलाल पालवी, दीपक वाघ, संदीप अमृतकार, रामकृष्ण पगार, उमेश पगार, काशिनाथ जाधव, दादा मोरे, रुपेश शिरोडे, यतीन पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विकास देशमुख यांनी केले. आभार सुधाकर पगार यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या