Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकफ्री चॅनेल्स वाढले; केबलचे दर तेवढेच

फ्री चॅनेल्स वाढले; केबलचे दर तेवढेच

नाशिक । प्रतिनिधी

ट्रायने फ्री टू एअर 200 चॅनल दाखविणे बंधनकारक केले आहे. तर पे चॅनेल्सचे दर 19 रुपयांच्या उच्चतम किमतीवरुन कमी करत 12 रुपये इतके केले आहे. तरीही चॅनेल्सच्या बुके पद्धतीने ग्राहकांना दरमहा द्यावे लागणार्‍या भाड्यात विशेष फरक पडणार नसल्याचे केबल चालक आणि एमएसओंकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरीटी ऑफ इंडियाने (ट्राय) मार्चपासून नव्या आदेशाप्रमाणे केबल चालकांना तसेच ब्रॉडकास्टर्सला केबल आणि चॅनेल्सच्या दरात देशभर साम्य असावे, यासाठी त्याचे दर आणि घेण्यात येणारे भाडेही निश्चित केले. त्यानुसार मागील वर्षापासून 100 चॅनेल्स फ्री दाखविण्याचे बंधन केले. त्यासाठी 130 रुपये भाडे अन् 18 टक्केने 23 रुपये जीएसटीसह 153 रुपये आकारण्याचे आदेशित केले. तर खासगी चॅनेल्सचे दर निश्चित करत कोणत्याही चॅनेल्सला 19 रुपयांपेक्षा जास्त दर न लावण्याचे स्पष्ट केले.

शंभर चॅनेल्सच्यावर प्रति 25 चॅनेल्ससाठी 20 रुपये नेटवर्क कॅपॅसिटी फी (एनसीएफ) आकारण्यात येते. त्यामुळे 100 पेक्षा वाढीव चॅनेल्सच्या दरांव्यतिरिक्त एनसीएफपोटी 80 रुपये द्यावे लागत आहेत. मार्चनंतर ते 200 चॅनेल्सपर्यंत आकारता येणार नाही. त्यानंतर पुढील चॅनेल्ससाठी ते द्यावे लागणार आहे. परंतू या मोफत चॅनेल्समध्ये अनेक उपयोग शुन्य चॅनेल्स असल्याने त्याचा ग्राहकांना विशेष फायदा होणार नसल्याचे केबल चालकांकडून सांगण्यात आले नाही.

दरम्यान, ट्राय ने मार्चपासून नव्याने लागू केलेल्या चॅनेल्स दर आणि इतर निर्णयाबाबत ब्रॉड कास्टर्स न्यायालयात गेले आहे. त्यावर अद्याप सुनावणी झाली नाही. त्यामुळे या सुनावणीनंतर नव्यानेही दर पुढे येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या