Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नोकरीच्या अमिषाने सहा लाखांना गंडा

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) –  मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नोकरीला लावून देतो, म्हणून एकाने दोघांना सहा लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूक करणारा अभिषेक खळेकर (रा. गाडळकर मळा, नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अक्षय सुनील गोरे (वय- 27 रा. केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी खळेकर याने फिर्यादी व त्यांच्या सोबतच्या एकाकडून 6 डिसेंबर 2019 ते 15 जानेवारी 2020 दरम्यानच्या काळात नगर येथील मिलीटरी हॉस्पिटलमध्ये नोकरीला लावून देतो म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी सहा लाखांची रक्कम घेतली. बनावट शिक्के व दस्तावेज तयार करून तो खरा म्हणून वापरला व फिर्यादी यांची व त्यांच्या सोबतच्या एकाची फसवणूक केली. शिक्के व दस्तावेज बनावट करून खळेकर याने आपली फसवणूक केली असल्याचे गोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी खळेकर विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार औटी करत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!