Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

साईभक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ जणांना अटक

Share
श्रीगोंदा पोलिसांनी आठ दिवसात पकडला आरोपी, Latest News Shrigonda Police Arrested Criminal

शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी येथे येणार्‍या साईभक्तांना जास्त दराने फूल, हार व शाल तसेच साईबाबा यंत्र दाखवून मोफत दर्शन व साईबाबा भक्त निवासमध्ये राहण्यासाठी जास्त रक्कम घेऊन रूम मिळवून देणे अशा प्रकारची फसवणूक करणार्‍या नऊ जणांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी एसटी स्टॅण्ड ते साई मंदिर परिसरादरम्यान साईबाबा समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणार्‍या साईभक्तांना रस्त्यात अडवून किंवा त्यांच्या गाड्या अडवून त्यांना बळजबरीने जास्त रक्कम घेऊन फूल, हार घेणे, साईबाबा यंत्र दाखवून मोफत दर्शनाची लालूच दाखविणे तसेच साईबाबा भक्त निवासात राहण्यासाठी जास्त पैसे घेऊन रूम मिळवून देणे यासाठी देवेंद्र दत्ता लांबोळे (बाजारतळ शिर्डी), सुनील काकासाहेब उमाप (बिरोबानगर शिर्डी), खंडू शंकर सोनवणे (गोदावरी वसाहत साकुरी),

सुरज प्रकाश पाकळ (पानमळा शिर्डी), सुनील सुरेश भालेराव (खडकी कोपरगाव), अनिल बंडू मातोडकर (शिर्डी), सुनील लक्ष्मण कर्नाटके (कोते गल्ली शिर्डी), आदेश खंदारे (कालिकानगर शिर्डी), राम विजय मुदलीयार (बाजारतळ शिर्डी या नऊ जणांना शिर्डी उपविभाग पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे,

सहा. पो. नि. गंधाले, पो. उपनिरीक्षक मिथुन घुगे, श्री. सोनवणे, पो. ना. थोरात, पो. कॉ. कोहक, श्री. शेलार या पथकाने साध्या वेषात जाऊन या नऊ जणांना ताब्यात घेतले. या आरोपींकडून साईयंत्र, पिवळी व हिरव्या कलरची शाल अशा प्रकारचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केेले.

याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशन पो. कॉ. गौरव वसंत राऊत यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गु.र.नं. 795/2019 प्रमाणे भादंवि कलम 420, 511, 341, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला अहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!