घरकुल गैरव्यवहार : पालकमंत्री शिंदे यांचे चौकशीचे आदेश

0
पिपंरी निर्मळ (वार्ताहर) – राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ ग्रांमपंचायतीमध्ये सन 2002 ते सन 20012 या काळात वाटप झालेल्या घरकुलांच्या चौकशीचे आदेश अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शिंदे यांनी दिले असून या काळात वाटप झालेल्या अनेक लाभार्थ्यांच्या तक्रारी आहेत. गावातील सामाजीक कार्यकर्ते संतोष निर्मळ यांनी माहिती अधिकारात माहिती घेऊन याबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती.चौकशी आदेशामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
पिंपरी निर्मळ गावात वाटप झालेली घरकुलांची प्रकरणे प्रामुख्याने 2002 ते 2012 काळातील आहेत.या काळात जवळपास दीडशेच्यावर घरकुलांचे वाटप झालेले असून हे वाटताना मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप निर्मळ यांनी केला आहे. याबाबतची सर्व माहिती अधिकारात उपलब्ध करून पालकमंत्री ना.राम शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. यामध्ये बोगस लाभार्थी दाखवून परस्पर पेमेंट काढणे, गावातील रहिवाशी नसताना घरकुलाचा लाभ घेणे, तर काहींना डबल लाभ देण्याचा गंभीर आरोप या तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
पालक मंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेत त्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकार्‍यांना याबाबत चौकशी करून कार्यवाहीचे आदेश केले आहे. कार्यकारी अधिकार्‍यांनी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांकडे याबाबत सखोल अहवाल मागितला आहे. गटविकास अधिकार्‍यांनीही श्री.गायकवाड कक्ष नियंत्रक यांचे मार्गदर्शनाखाली त्रीसदस्यीय कमेटी तयार करून ग्रांमपंचायतीचे दप्तर तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठवड्यात याबाबत चौकशी होणार आहे. या चौकशीच्या आदेशामुळे ग्रामस्थाच्या मागणीला बळ मिळाले आहे.

 

LEAVE A REPLY

*