संगमनेर : ‘धनगंगा’त अपहार करणारे अद्याप पसारच

0

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील घुलेवाडी येथील धनगंगा स्वयंसहाय्यता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत 3 कोटी 91 लाख 61 हजार 254 रुपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 25 जणांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल होवूनही अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नसल्याने ठेवीदारांमधून संताप व्यक्त होत आहे.

दि. 30/9/2009 ते 29/9/2017 पर्यंतच्या कालावधीत पदाचा गैरवापर करुन व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याने गैरवापर करून अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर 25 जणांवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होवून तब्बल महिना होत आला असून अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नसल्याने खातेदारांसह ठेवीदारामधून संताप व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. परदेशी करत आहे.

अपहार प्रकरणातील आरोपी
व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे, क्लार्क सचिन सुकदेव सोनवणे, अकौंटंट विनायक दामोधर कांडेकर, कॅशियर शहनाज मेहबुब सय्यद, शिपाई सोमनाथ भागाजी राऊत, अध्यक्ष रंगनाथ काशिनाथ काशिद, उपाध्यक्ष किरण रामदास जाधव, संचालक शांताराम मुक्ताजी राऊत, आनंदा लहानु पानसरे, विक्रम बाजीराव गुंजाळ, महादेव दगडू अरगडे, प्रविण छबु भावसार, राजेंद्र मल्लू गायकवाड, प्रविण कारभारी ढमाले, बेबी संजय सोनवणे, सुनंदा बाळासाहेब सातपुते, भिकाराम गोपीनाथ राऊत, आण्णासाहेब गंगाधर नवले, बाळासाहेब धर्माजी नवले, सचिन गोविंद काळे, अशोक लहानू पानसरे, बाबासाहेब नाना राऊत, नामदेव देवराम घोडे, जिजाबाई देवीदास पांडे, अलका अशोक काशिद

LEAVE A REPLY

*