अर्बन बँकेच्या शाखाधिकार्‍यासह आठ जणांवर गुन्हा दाखल

0

कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – एका अर्थसहाय्य कंपनीकडून कर्ज घेऊन त्यांना तारण दिलेल्या मालमत्तेवर आरोपींनी पुन्हा कर्ज काढले. तसेच तारण दिलेल्या मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावून कंपनीची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश पंढरीनाथ भांबरे (रा. शिवनेरी चौक) यांची ए. यु हाउसिंग फायनान्स प्रा. लि या कंपनी आहे. भांबरे यांनी डॉ. शशिकांत लाड व सुवर्णा लाड यांना फेब्रुवारी 2017 ते दि. 18 ऑक्टोबर 2014 या दरम्यान गृहकर्ज म्हणून पाच लाख 65 हजार दिले होते. त्यास तारण म्हणून नागरदेवळा येथील 0 हेक्टर शंभर आरचे चौरस मिटरचे क्षेत्रफळ देण्यात आले होते. त्यानंतर आरोपी लाड यांच्यासह अन्य चौघांनी ही मालमात्ता नगर अर्बन बँक गुलमोहर शाखेस तारण देऊन 8 लाख 75 हजार रुपये कर्ज अणखी घेतले.

त्यानंतर आरोपी निसार, हनिफ व महंमद शेख यांनी राजेश भांबरे यांच्या मिळकतीचे परस्पर खोट्या आशयाचे दस्तावेज तयार करून सहायक दुय्यम निबंधक कार्यालयातून विल्हेवाट लावली. हा प्रकार भांबरे यांच्या लक्षात आला असता त्यांनी चौकशी केली. यात आठ जणांना वेगवेगळ्या पद्धतीने कट रचून कंपनीची व भांबरे यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. शशिकांत आदिनाथ लाड, सुवर्णा शशिकांत लाड (रा. निलकंठ सोसा. नगर), भाऊसाहेब मोहन कांडेकर (रा. हिंगणगाव), भीमराव विश्‍वनाथ सानप, नगर अर्बन बँक गुलमोहर शाखेचे शाखाधिकारी (नाव माहित नाही), निसार नजीर अहमद शेख, महंमद हनिफ नजीर शेख अशा आठ जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

*