पोकलँड विक्रीच्या बहाण्याने व्यापार्‍याला लुटले

0

पाथर्डी (प्रतिनिधी) – तालुक्यातील मिरी येथे पोकलँड मशीन विकत देण्यासाठी बोलावून पुणे जिल्हयातील ठेकेदाराची सुमारे तेरा लाख रुपयांची लुट केल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दोन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पुरंदर (जि. पुणे) तालुक्यातील वाळुंज येथील विकास गोविंद इंगळे हे पोकलँड व जेसीबी मशीनच्या मदतीने मातीकाम करण्याचा व्यवसाय करतात. वाळूंज येथील पाटील यांच्या शेतजमिनीत कंपाउडचे काम चालू असतांना कांबळे नावाच्या व्यक्तीशी विकास गोविंद इंगळे यांची ओळख होऊन कांबळे याने त्यांच्याकडे मिरी शिवारात पोकलँड मशीन विक्रीस असल्याचे सांगितले.

सोमवार (24 जुलै) रोजी सकाळी नऊ वाजता कांबळे नावाच्या व्यक्तीने फोन करून पोकलँड खरेदी करण्यासाठी पांढरीचा पुल येथे येण्याचा निरोप दिला. विकास इंगळे हे त्यांचे वडील व मेहुणेे यांच्यासह स्कार्पिओ गाडीने मिरी येथे आले. मिरी-घोडेगाव रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन लोकांनी विकास इंगळे यांना हात दाखवुन गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून पोकलँडचे काम ओढ्याच्या पलीकडे चालू आहे, असे सांगून आमच्या बरोबर चला असे सांगितले.

तेव्हा इंगळे हे त्यांच्या बरोबर गेले असतांना दहा ते पंधरा अज्ञात लोकांनी इंगळे यांना मारहाण करून सोळा हजार रुपये किंमतीचा मोबाईल व पंधरा हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल व बारा लाख रुपये रोख असा, बारा लाख पन्नास हजारांचा ऐवज मारहाण करून लुटुन नेला. याबाबत विकास इंगळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी कलम 395, 420 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी. डी. पावसे करत आहेत.

LEAVE A REPLY

*