Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

चौदा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या; नाशिकला मिळणार नवे अधिकारी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

काल (दि. ०६) रोजी रात्री उशिरा १४ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार त्यानुसार तत्काळ त्यांना नियुक्तीच्या जागी पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासह इगतपुरी त्र्यंबकचे प्रांत, बागलाणचे नगर परिषदेचे मुख्याधिकारयांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल्या झाल्यामुळे नव्या अधिकाऱ्यांना कमी वेळेत परिसराचा अभ्यास करावा लागणार आहे.

बदल्यांमध्ये नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांचाही समावेश असून त्यांना नाशिकच्या पर्यटन उपसंचालक पदाचा पदभार देण्यात आला आहे.

नाशिक नवे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून धुळे येथील भूसंपादन अधिकारी भागवत डोईफोडे हे आज पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूकीपूर्वी नाशिकला निवडणूक उपजिल्हाधिकारी पदी रुजू झालेले अरुण आनंदकर यांची नऊ महिन्यातच बदली झाली असून त्यांच्याकडे उपजिल्हाधिकारी प्रबोधिनीचा कारभार देण्यात आला आहे.

नाशिकचे निवडणूक उपजिल्हाधिकारीपदी कुंदन सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  त्र्यंबकेश्वर-इगतपुरी प्रांत राहुल पाटील यांची महापालिका नाशिक येथे उपायुक्तपदी बदली.

तर म्हाडाचे मुख्याधिकारी रमेश मिसाळ जिल्हा पुरवठा अधिकारी धुळे पदावर रुजू होणार आहेत. तसेच बागलाणचे प्रांत प्रवीण महाजन यांची म्हाडा मुख्याधिकारी नाशिक येथे बदली झाली आहे.

उपसंचालक पर्यटन संचनालय नाशिक नितीनकुमार मुंडावरे यांची उपसंचालक पर्यटन संचनालय कोकणपदी बदली झाली आहे. नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची नगर जिल्हा प्रांत अधिकारी पदी बदली. उन्मेश महाजन, सहाय्यक आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय येथून धुळे प्रशासन उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे.

श्रीरामपूर, नगर प्रांत तेजस चव्हाण हे त्र्यंबकेश्वर त्रंबकेश्वर-इगतपुरी प्रांत म्हणून पदभार स्वीकारतील. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण आनंदकर यांची अवघ्या महिन्यातच बदली झाली आहे. लोकसभा निवडणुकी पूर्वी म्हणजे 14 फेब्रुवारी 2019 मध्ये नाशिकला बदली झाली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!