Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

विधानसभेत मनसेसह चार आमदार राहिले तटस्थ; जाणून घ्या सविस्तर

Share

मुंबई । प्रतिनिधी 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज १६९ आमदारांच्या पाठबळाने पारित झाला. विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले असून यामध्ये आज पहिली परीक्षा महाविकास आघाडी पास झाली आहे.

दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यावेळी बहुमत घेण्यात आले. भाजपकडून सभात्याग करण्यात आल्यानंतर उपस्थित सदस्यांसोबत ठरवला सुरुवात करण्यात आली. यावेळी १६९ मतांनी हा विश्वासदर्शक ठराव जिंकला.

तर बहुमत चाचणीच्या वेळी मनसे, एमआयएम आणि सीपीआय यांचे एकूण चार आमदार तटस्थ राहिले.  कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला.

तर शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी प्रस्तावाचे अनुमोदन केले. त्यानंतर जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनीही सहमती दर्शवली. आवाजी मतदान घेत विश्वासदर्शक ठराव संमत करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!