Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर : कौठे कमळेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी

Share

संगमनेर (प्रतिनिधी) |  तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील जांभळीचा मळा येथे बिबट्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या चिमुरड्यासह चौघे जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.

कृष्णा वाल्मिक गायकवाड (वय अडीच वर्षे), संजय जगन भडांगे (वय 40) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. कौठे कमळेश्वर येथे कृष्णा वाल्मिक गायकवाड हा अंगणात खेळत होता.

त्याचदरम्यान पाठीमागून बिबट्याने येवून त्याच्यावर हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. तर या घटनेपासून पाचशे मिटर अंतरावर जांभळीचा मळा येथे याच बिबट्याने संजय भडांगे, एकनाथ थेटे (वय 55), संजय भुजबळ (वय 45) यांच्यावर हल्ला केला आहे.

या हल्ल्यात संजय भडांगे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर बिबट्याच्या हल्ल्यात एकूण चार जण जखमी झाले आहे. पैकी कृष्णा गायकवाड व संजय भडांगे या दोन जखमींना उपचारार्थ घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!