Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकVideo : मालेगावात प्रत्येकाची होणार करोना संसर्ग चाचणी; ४०० जणांचे पथक, परिसर...

Video : मालेगावात प्रत्येकाची होणार करोना संसर्ग चाचणी; ४०० जणांचे पथक, परिसर सील

नाशिक | प्रतिनिधी 

मालेगाव शहरात अचानक पाच कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर अहवाल येण्यापूर्वी एका ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापार्श्वभूमीवर शहरातील चार पोलीस स्टेशन हद्दीतला परिसर पूर्णपणे सील करण्यात येत आहे. जवळपास ४०० जणांची टीम शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करणार आहेत. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

- Advertisement -

आज सकाळीच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मालेगावमध्ये आढावा घेतला. पोलीस प्रशासन, स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेचा आढावा मांढरे यांनी घेतला. ते म्हणाले, काल पाॅझिटिव्ह  आलेल्या रुग्णांना कुठलीही बाहेरून जाऊन आल्याची हिस्ट्री नाहीये. त्यामुळे मालेगावात मोठा पेच निर्माण झाला असून सर्वांनाच आता यापासून सावध राहावे लागेल.

या आजाराचा मालेगाव मध्ये झालेला शिरकाव विचारात घेता अधिक रुग्ण त्यामुळे बाधित होतील ही शक्यता गृहीत धरून एक खाजगी रुग्णालय पूर्णपणे क्वारांटाईन हॉस्पिटल म्हणून अधिकृत करण्यात आले आहे आवश्यकतेनुसार अधिक दवाखाने तसेच वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवादेखील अधिकृत करण्यात येतील याकरता सर्व अधिकार घटना व्यवस्थापक डॉ डांगे व श्री नितीन कापडणीस यांना प्रदान करण्यात आले आहेत.

याचा संसर्ग पूर्णपणे रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत कठोर संचारबंदी लागू करण्यात येत आहे व जोपर्यंत यावर पूर्णपणे नियंत्रण येत नाही तोपर्यंत ती संचारबंदी सुरू राहील. यासंदर्भात अतिरिक्त मनुष्यबळ पोलीस विभागाकडे उपलब्ध आहे ते त्यांनी योग्य प्रकारे वापरावे अशा सूचना देण्यात आल्या. संचारबंदी मोडून जर कोणी गैरवर्तन करत असेल तर अशा व्यक्तींविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करावी अशी देखील सूचना दिल्या.

पुढील आठ दिवस घराबाहेर कुन्हीही पडणार नाही. पोलिसांची कुमक याठिकाणी तैनात असेल, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके वेगवेगळ्या परिसरात जाऊन तपासणी करतील. कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलीस किंवा प्रशासनाची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मालेगावातील जनतेला आता जिवंत राहण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. सुरुवातीपासून मालेगाववर विशेष लक्ष होते. काल अचानक पाच रुग्ण कोरोना पाझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, शहरातील चार पोलीस स्टेशनमध्ये असलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.  याठिकाणी अत्यावश्यक सेवाही बंद राहणार असून विशिष्ट नागरिक फक्त याठिकाणी प्रवेश करू शकतील.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन आहे. पोलीस संचारबंदीदरम्यान कर्तव्य बजावत आहेत तर नागरिकांना घरामध्य राहण्याचे आवाहन करण्यात आले असतानाही नाहक गर्दी नागरिक करत आहेत. आता तर याठिकाणी पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे येथील चोर पोलिसाचा खेळ बंद करून नागरिकांनी घरात बसल पाहिजे.

शहरातील जीवन हॉस्पिटलमध्ये कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांवर यापुढे उपचार होणार आहेत. याठिकाणची पाहणी मांढरे यांनी केली. आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना याप्रसंगी त्यांनी केल्या. जान बची तो लाखो पाये अशी सध्या मालेगावमधील परिस्थिती आहे. यापुढे कडक निर्णय घेतले जातील त्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.

मालेगाववासियांनो आतातरी सुधरा 

मालेगावमध्ये अतिशय अरुंद गल्ली बोळ आहेत. विनाकारण गर्दी करू नये. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नका. बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी करू नका. अगदीच महत्वाचे असेल तेव्हा स्वतःची काळजी घ्या.  सामाजिक अंतर ठेवा, मास्क वापरा. कारण रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना कुठलीही बाहेरून दाखल झाल्याची हिस्ट्री नाही. त्यामुळे घराबाहेर पडलात तर काय होईल माहिती नाहीये. त्यामुळे आता तरी काळजी घ्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या