Video : मालेगांव निवडणुकीत चार ड्रोन कॅमेरे ठेवणार नजर; राज्यात प्रथमच वापर

0

नाशिक : मालेगाव मनपा निवडणूकीचे मतदान थोड्याच दिवसांवर येऊन ठेपले आहे. मालेगाव निवडणूक अतिसंवेदनशील असल्यामुळे मतदानावेळी येथे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेने चांगलीच कंबर कसली आहे.

निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून चार ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने नजर ठेवली जाणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.

ते आडगाव येथील ग्रामीण मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधत होते.

LEAVE A REPLY

*