Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कृष्णगाव : भरधाव आयशरने भाविकांना चिरडले; चार ठार; २० जखमी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

सप्तशृंगी गड येथे देवीचे दर्शन आटोपून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांना भरधाव आयशरने चिरडल्याने चार भाविक ठार झाले तर २० ते २५ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. दिंडोरी तालुक्यातील कृष्णागावजवळ हा अपघात घडला.

मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वणी मार्गे नाशिककडे परतणाऱ्या भाविकांची आयशर गाडी नादुरुस्त झाली होती. मिळेल त्या गाडीने नाशिक गाठायचे या इराद्याने वाट बघत असलेल्या भाविकांना मागून येणाऱ्या आयशर वाहनेच धडक देत चिरडले. या घटनेत चार भाविकांची दुर्दैवी मृत्यू झाला तर इतर २० ते २५ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात ठार झालेल्या चौघांपैकी तिघे युवक पंचवटीतील पेठरोड येथील असल्याचे समजते.

सागर अशोक ठाकूर (23), कुणाल कैलास ठाकूर (25), गणेश भगवतीप्रसाद ठाकुर (30), व त्र्यंबकेश्वर येथील आशिष माणिक ठाकूर (30) यांचा समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींवर वणी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच दिंडोरी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!