Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

नवी दिल्ली:

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे. मृ्त्युसमयी ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी त्यांची प्रकृती नाजूक होती. सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

अनुभवसिद्ध राजकारणी…कार्यकर्ता ते राष्ट्रपती…असे घडले प्रणवदा !

प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताची गाठी झाली होती. १० ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी त्यांना दिल्लीतील लष्करी छावणीत असलेल्या लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना करोनाची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणेसाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही.

प्रणव मुखर्जी देशाचे १३वे राष्ट्रपती आहेत. ते राष्ट्रीय राजकारणात १९६९ पासून सक्रिय होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी कॉंग्रेस पक्षामधून राजीनामा दिला. भारत सरकारने २००८ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला. तसेच ८ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.

राष्ट्रपतींकडून शोकसंवेदना

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टि्वट करून प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. टि्वटमध्ये म्हटले आहे की, “माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल ऐकून मन दुखावले. त्यांचा मृत्यू एका युगाचा अंत आहे. प्रणव मुखर्जी यांचे कुटुंबीय, मित्र आणि सर्व देशवासियांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो.’

- Advertisment -

ताज्या बातम्या