Thursday, May 2, 2024
Homeनगरमाजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली 'ही' मागणी

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली ‘ही’ मागणी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

गुलाब चकीवादळाच्या (Gulab Hurricane) प्रभावाने झालेली अतिवृष्टी आणि हस्त नक्षत्राच्या पावसाने (Rain) उडविलेली दाणादाण यामुळे कोपरगांव विधानसभा मतदारसंघातील (Kopargaon Assembly constituency) शेतकर्‍यांच्या खरीप पिकाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्याची पिके पाण्यात सडली आहेत. तेव्हा सरसकट पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी (Government Should Compensate) अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे (BJP state secretary and former MLA Snehlata Kolhe) यांनी केली आहे.

- Advertisement -

गुरूवारी सौ. स्नेहलता कोल्हे (BJP state secretary and former MLA Snehlata Kolhe) यांनी तहसिलदार विजय बोरुडे (Tahsildar Vijay Borude) यांची भेट घेवून प्रलंबित समस्या संदर्भात चर्चा केली. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, पालिका गटनेते रविंद्र पाठक, सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांचे संचालक साहेबराव कदम, दिपक चौधरी, विनोद राक्षे, निलेश बोर्‍हाडे, आदि उपस्थित होते. सौ. कोल्हे म्हणाल्या, दसरा दिवाळी सण तोंडावर आले आहेत. करोना आपत्तीत केंद्र व राज्य शासनाने विनामोबदला स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरीत करावे जेणेकरून त्याचा फायदा शिधापत्रिकाधारकांना होईल.

ज्या ज्या शिधापत्रिकाधारकांचे विभक्तीकरण झालेले आहे. त्यांचा अन्न सुरक्षा यादीत समावेश करावा त्याचप्रमाणे गोदावरी नदीला पुर (Godavari River Flood) आल्यानंतर शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन या शेतकरी बांधवांना अद्यापही शासकीय भरपाई मिळालेली नाही ती तात्काळ देण्यात यावी. मतदार संघात गेल्या दोन आठवडयापासुन मुसळधार पाउस होत आहे. खरीपाचे पीक (Kharip Crops) काढणीला आले आहे मात्र निसर्गाने त्यावर वरवंटा फिरविला आहे. अद्यापही शेतात पाणी साठलेले आहे. सोयाबीन (Soybeans), मका (Corn), बाजरी (Millet), कापूस (Cotton), कांद्याची रोपे (Onion Crops) आदि खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या