अहमदनगर : माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – माजी आमदार राजीव आप्पासाहेब राजळे यांचे शनिवारी रात्री 10.30 वाजता निधन झाले.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

त्यांच्यावर रविवारी सायंकाळी 4.30 वाजता पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

राजळे यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक वर्तुळाला धक्का बसला. 5 डिसेंबर 1969 रोजी कासार पिंपळगाव येथे त्यांचा जन्म झाला होता.
निधनसमयी ते 48 वर्षांचे होते. आपल्या राजकारणाची सुरूवात युवक काँग्रेसमधून केल्यानंतर 2004 मध्ये ते शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून आमदार झाले होते. अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा राज्याला परिचय होता.

जिल्ह्यातील राजकारण, सहकार, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात त्यांचा वावर होता. अनेक संस्था, संघटनांवर ते कार्यरत होते. 2014 त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

सहकारातील नेते अप्पासाहेब राजळे यांचे ते चिरंजीव तर विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचे ते पती होत. माजी महसूल  मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे होत.

LEAVE A REPLY

*