माजी आ.जयंत ससाणे यांचे निधन

0

श्रीरामपूर: माजी आमदार जयंत ससाणे (वय 62) यांचे सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास निधन झाले.

ते शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष होते.

श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी दोन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले.

शहराचे १५ वर्षे नगराध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता श्रीरामपूर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

LEAVE A REPLY

*