एकस्तर वेतनश्रेणी हा प्राथमिक शिक्षकांचा हक्क : पिचड

0
राजूर (वार्ताहर) – आदिवासी भागात काम करणार्‍या प्राथमिक शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणी लागू करण्यात आली हा त्यांचा हक्क आहे. या हक्काच्या लढाईला आज यश आले आहे. असे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी म्हटले आहे.
अकोले तालुक्यातील आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. वैभवराव पिचड, जिप चे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या सत्काराचे आयोजन राजुर येथे सांस्कृतिक भवनात केलेे होते. यावेळी पिचड बोलत होते.
पिचडे म्हणाले की, आपण समाजासाठी लोकांसाठी काम करीत राहिलो. अन्यायाविरुध्दही लढलो. संविधानाने दिलेले हक्क अबाधित राहिले पाहिजे. एकस्तर वेतनश्रेणीसाठी आ. वैभवराव पिचड व कैलासराव वाकचौरे यांनी पाठपुरावा केला. गेली काही वर्ष हा लढा सुरु होता.
त्याला यश आले त्याचा आनंद सोहळा तुम्ही साजरा करीत आहात. हक्कासाठी लढणे गैर नाही. हाच लढावूपणाचा वारसा या पदाधिकार्‍यांनी जपला याचा मला मनस्वी आनंद आहे.
आ. वैभवराव पिचड म्हणाले की, आदिवासी भागात काम कारणार्‍या सर्वच विभागातील शासकीय-निमशासकीय कर्मचार्‍यांना एकस्तर वेतन श्रेणी लागू करावी हा निर्णय माजी मंत्री मधुकरराव पिचड मंत्री असताना केला होता. त्याचा लाभ आज तुम्हाला मिळत आहे. इतर कर्मचार्‍यांना तो मिळत होता. प्राथमिक शिक्षक मात्र त्यापासून वंचित होते. यासाठी आपण प्रयत्न केले.
त्याला आज खर्‍या अर्थाने यश आले. शिक्षक जे कष्ट करतात त्याचे दाम त्यांना मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रात आज शासन रोज नवनवीन निर्णय घेत आहे. त्यामुळे खुप अडचणी निर्माण होत आहेत. 20 पटाच्या 124 शाळा तालुक्यातील बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला याविरुद्ध आपण विधिमंडळात आवाज उठवला त्या निर्णयाला स्थगिती मिळाली. दुर्गम भागात वस्ती शाळांची निर्मिती केली कारण ती गरज होती. पण आज सरकार मात्र सगळीच उलटी धोरणे घेत आहे. शिक्षकांच्या प्रश्नांमध्ये आपण यापुढेही जाणीवपूर्वक लक्ष घालू त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहू.
कैलासराव वाकचौरे म्हणाले की, आम्ही जे प्रयत्न केले त्याला उशिरा का होईना यश आले एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्यामध्ये खूप अडचणी होत्या. पण जिप चे अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी यांनीही खूप मदत केली. जिप अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले यांचेही योगदान यामध्ये आहे.
शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षक योगेश थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सोमनाथ उघडे यांनी केले. तर सुत्रसंचालन अर्जुन तळपाडे यांनी केले.
यावेळी राजूरचे उपसरपंच गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, माधव गाभाले, सी.बी.भांगरे, विजय भांगरे, विजय लहामगे या मान्यवरांसह प्रतिक नेटके, प्रल्हाद कोंडार, भाऊसाहेब भांगरे, भास्कर तातळे, राजेश पवार, प्रशांत गवारी, सतिष म्हस्के, दिपक बोर्‍हाडे, भगवान भांगरे, मीनल चासकर, किरण लांडे, दगडू बांबळे, अमोल सुकटे आदी प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.

19 शाळा बंद चे आदेश …
अकोले तालुक्यातील 10 पट संख्या असलेल्या 19 शाळा बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून यापूर्वीही 20 पटाचे 124 शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण त्याला स्थगिती मिळाली असल्याचे शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*