Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

माजी मंत्री बी.जे.खताळ पाटील अनंतात विलीन

Share

संगमनेेर (प्रतिनिधी)- राजकारणातील चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आणि तत्वनिष्ठ राजकारण, सहकार, साहित्य, शिक्षण, सिंचन अशा विविध क्षेत्रांत बहुमूल्य योगदान देणारे माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे सोमवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास निधन झाले. सायंकाळी 4 वाजता प्रवरा काठी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोेलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या 24 फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रेस सुरुवात झाली. यावेळी पोलीस दलाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. प्रशासनाच्यावतीने त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले. शहरातील नगरपालिका, मेनरोड, तिनबत्ती चौक मार्गे अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रवरा नदी किनारी खास तयार करण्यात आलेल्या ठिकाणी विविध क्षेत्रांतील व सर्वपक्षीय मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. प्रकाश, अरुण, संजय, राजेंद्र या त्यांच्या मुलांनी अग्नीडाग दिला.

ग्रामीण भागातून अनेक वयोवृद्ध चाहत्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. त्याचबरोबर राज्यभरातून विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते. ‘खताळ पाटील अमर रहे’ या घोषणा उपस्थितांकडून दिल्या जात होत्या. प्रवरा नदीकाठचा मैदान, प्रवरा पूल नागरिकांनी फुलून गेला होता. आपल्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक उपस्थित होते.

बी. जे. खताळ पाटील यांच्या पश्‍चात प्रकाश, अरुण, संजय, डॉ. राजेंद्र ही चार मुले, तर डॉ. प्रमिला रवंदळे पाटील ही कन्या, सुना, नात सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शालिनीताई विखे पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, दैनिक सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, मधुकरराव नवले, डॉ. संजय मालपाणी, साहेबराव नवले, अरुण कडु पाटील, दशरथ सावंत, माजी सनदी अधिकारी भगवंतराव मोरे, वसंतराव नाईक शुगर महासंघाचे सर्वेसर्वा शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, सतिष गुंजाळ, नायब तहसिलदार सुभाष कदम, अ‍ॅड. बच्चु आठरे, युटेक शुगरचे संस्थापक रवींद्र बिरोले, जवाहर शिक्षण संस्थेचे प्रा. राजेंद्र देशमुख, वसंतराव कापरे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, अशोक भांगरे, आबासाहेब थोरात, दिलीपराव शिंदे, कपिल पवार, डॉ. अशोक इथापे, अ‍ॅड. सुहास आहेर, अ‍ॅड. सदाशिव थोरात, अ‍ॅड. बापुसाहेब गुळवे, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास तांबे, समाजप्रबोधनकार दीपक महाराज देशमुख, साहेबराव वलवे, भाजपाचे राजेंद्र देशमुख, राजेंद्रसिंह चौहाण आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शोक संदेश
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आदि मान्यवरांनी बी. जे. खताळ पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आढळा मध्यम प्रकल्पाला खताळ पाटलांचे नाव देण्याची मागणी
राज्याचे तत्कालीन पाटबंधारे मंत्री बी. जे. खताळ पाटील यांनी कृपादृष्टी करून आढळा परिसरातील शेतकर्‍यांसाठी देवठाण येथे 1060 दशलक्ष घनफूट क्षमतेचा मध्यम प्रकल्प निर्माण केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे सर्व घडू शकले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला खताळ पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आढळा परिसरातील नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे. मध्यम प्रकल्प खताळ पाटील यांचे नाव दिल्यास त्यांना ही खरी आदरांजली ठरेल, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!