भाजपपुढे विषारी विचारसरणीचा आदर्श! : ऐक्य परिषदेत कोळसे पाटील यांचा आरोप

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – देशात स्वातंत्र्य विचाराचे तरुण निर्माण झाले पाहिजे. भाजपसमोर विषारी विचारसरणीचा आदर्श आहे. मोदी यांची लोकप्रियता मॅनेज केलेली असून त्यांच्या काळात गुजरातमध्ये दंगल घडली. राजकारणात देव, धर्म आणू नयेत, असे मत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.
सावित्री-फातेमा विचार मंचच्यावतीने नगरच्या क्लेरा ब्रुस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेत कोळसे पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते मौलाना खलीलुरहमान सज्जाद नौमानी होते. यावेळी जमाअते इस्लामी हिंदचे तौफिक अस्लम खान, मराठा सेवा संघाचे गंगाधर बनबरे, इंजीनिअर विजयकुमार ठुबे, बामसेफचे कुमार काळे, लिंगायत समाजाचे शिवानंद हैबतपुरे, माळी महासंघाचे शंकरराव लिंगे, रामदास महाराज जाधव, सत्यपाल महाराज शिरसोलीकर, कॉ.स्मिता पानसरे, अशोक गुंजाळ, बहिरनाथ वाकळे, अभिजीत वाघ, मौलाना अन्वर नदवी आदी उपस्थित होते.
यावेळी कोळसे पाटील म्हणाले, भाजप विरोधातील लढाई ही वैचारिक पातळीवरची लढाई आहे. या विषारी विचारसरणीला छेद देण्यासाठी बंधुभावाचा संदेश या ऐक्य परिषदेच्या माध्यमातून दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मौलाना नौमानीे म्हणाले की, मनुष्य समानतेवर विश्‍वास ठेवत नाही. ही व्यवस्था भारतीय नसून बाहेरून आलेली ही व्यवस्था आहे. देशात शोषित वर्गाला एकत्र करण्याचे काम ही परिषद करत आहे. यामुळे जागृकता येत आहे. सरकार बदलून परिवर्तन होणार नाही. यासाठी व्यवस्था बदलण्याची गरज आहे. व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे. जो मुस्लिम नाही ते सर्व हिंदू हा मुस्लिम समाजाचा भ्रम झाला. शोषित वर्गाशी भाईचारा वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी सत्यपाल महाराज शिरसोलीकर यांचे समाज प्रबोधनावर प्रवचन झाले. त्यानंतर लिंगायत समाजाचे शिवानंद हैबतपुरे, कॉ.स्मिता पानसरे, विजयकुमार ठुबे, रामदास महाराज जाधव, बामसेफचे कुमार काळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.रफिक सय्यद यांनी केले.

LEAVE A REPLY

*