Type to search

धुळे फिचर्स

बोरगावनजीक अपघातात वनविभागाचा कर्मचारी ठार

Share

धुळे

बोरगाव ता. धुळे नजीक कारने मोटर सायकलला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात वनविभागातील कर्मचारी ठार झाला. अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, सुखदेव हिरामण बागुल यांच्यासोबत बापू फकीरा भिल हे दोघे मोटरसायकलीने शिंदखेडा येथून सोनगीरमार्गे होळ गावाकडे येत असताना बोरगाव जवळ मागून येणार्‍या कार (क्र.एमएच 18 / डब्यूल 2232) ने मोटारसायकलीला जोरदार धडक दिली.

त्यात मोटरसायकलवरील सुखदेव बागुल व बापू भिल हे दोघे रस्त्यावर फेकले गेले व जखमी झाले. दोघा जखमींना उपचारार्थ धुळे येथील चक्करबर्डी जवळील हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना बापू फकिरा भिल यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अपघाताचे वृत्त समजताच होळ गावावर शोककळा पसरली. मयताचा मुलगा गणेश बापू भिल यांनी तालूका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाच्या कर्मचार्‍याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!