वनविभागाच्या आशिर्वादाने सोनईत बेकायदेशीर सॉ मिल

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट कागदपत्रांच्या आधारे 1978 सुरू असलेल्या सोनई (ता.नेवासा) येथील एका सॉ मिलवर व सॉ मिल सुरू ठेवण्यास सहाय्य करणार्‍या वनविभागाच्या अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई व्हावी, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
या आंदोलनात कमलाकांत सरोदे, शरद लिपाने, सुरेश लोखंडे, दतात्रय गडाख, गोरख निमसे सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सोनईत 1978 बनावट कागदपत्रांच्या आधारे सॉल मिल सुरू आहे. ही सॉल मिल सुरू ठेवण्यासाठी सोनई ग्रामपंचायतीचे वेळोवेळी बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार करून ते वन विभागाला सादर करण्यात आले आहेत. या प्रमाणपत्राची नगरच्या वन विभागाने कोणत्याही प्रकारे शाहनिशा न करता संबंधित सॉल मिलला परवानगी दिली आहे.
सोनई ग्रामपंचायतीचे बनावट नाहकत प्रमाणपत्र तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीचे बनावट दाखले तयार करण्यात आले असून याबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता, त्यांचा याच्याशी काही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी वन विभागाच्या नागपूर, नाशिक, अहमदनगर तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी नगरच्या उपवनसंरक्षक यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, त्यात टाळाटाळ होत आहे. वारंवार तक्रार करूनही या सॉल मिलच्या परवानगीची साधी चौकशी होत नसल्याने तक्रारदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहरजिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, अभिजीत खोसे, भरत गारुडकर, संजय झिंजे, बाबासाहेब गाडळकर यांनी पाठिंबा देत, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

*