आज परदेशातील भारतीय युवक विद्यार्थ्याशी संवाद साधणार

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – आपल्या देशातील विद्यार्थ्याच्या हितासाठी परदेशातील भारतीय युवक पुढे सरसावले आहेत. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी व्हिडीओ कॉनङ्गरन्सव्दारे ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याशी संवाद साधणार आहेत.
इंटरनेट उपलब्ध असणार्‍या तालुकानिहाय प्रत्येकी 2 याप्रमाणे 28 शाळांची यासाठी निवड यासाठी करण्यात आली आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे जिल्ह्यात सेवेत असताना अमेरिकेला प्रशिक्षणासाठी गेले होते.
दरम्यान त्यांची काही भारतीय तरुणांशी भेट झाली. त्या भारतीय युवकांनी परदेशात एकत्रित येवून ग्लोबलनगरी ग्रुप तयार केला आहे. त्या माध्यमातून विधायक उपक्रम राबविले जातात.आपल्या जिल्ह्यात असे उपक्रम राबविण्याची इच्छा त्यांनी जिल्हाधिकारी कवडे यांच्याकडे व्यक्त केली होती.
त्याचेच एक पाऊल म्हणून जिल्हाधिकारी अभय महाजन व झेडपी सीईओ रविंद्र बिनवडे यांनी त्यांची सकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सदर उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्याशी संवाद साधणारे परदेशातील भारतीय हे विविध क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अनेकांचा समावेश आहे.
ते विद्यार्थ्याची संवाद साधताना त्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या अडचणी समजावून सांगणार आहे. त्यामुळे निश्‍चितच झेडपी शाळेतील विद्यार्थ्याना पे्ररणा मिळणार आहे. गतवर्षी 42 विद्यार्थ्याना हवाई सङ्गरव्दारे ईस्त्रोवारी घडवून आणल्यानंतर पुन्हा शिक्षण क्षेत्रात नाविन्य उपक्रमक राबविले जात असल्याने याचा भावी आदर्श नागरिक घडविण्यासाठी निश्‍चित उपयोग होणार आहे.

राहुरी-ब्राम्हणी, टाकळीमियॉ, कोपरगाव-संवत्सर,राहाता-शिर्डी, डोर्हाळे, नेवासा-सौंदाळा, वाकडी, श्रीरामपूर-पढेगाव, केशवगोविंदबन,संगमनेर- येलुशीवाडी, अकोले-औरंगपूर, नगर-हिवरेबाजार, निबोंडी, पारनेर-राळेगणसिध्दी, देवीभोयरे शेवगाव-खामगाव, रामनगर, पाथर्डी- मढी, शेकटे, श्रीगोंदा-पवारवाडी, हंगेवाडी, कर्जत-घुमरी व जामखेड आदि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संवाद साधणार आहे. 

LEAVE A REPLY

*