Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : दांडिया शिकण्यासाठी ब्राझीलहून गाठले नाशिक; भारतात नेहमीच आनंद मिळतो पर्यटकांची भावना

Share

नाशिक | मानसी खैरनार 

भारतीय सण उत्सवाची शैली ही परदेशी नागरिकांना कायमच आकर्षित करत असते. गणेशोत्सव असो वा नवरात्रोत्सव, दिवाळी असो वा दसरा नेहमीच भारतीय संस्कृती अनुभवण्यासाठी परदेशी पर्यटक दाखल होतात. यंदाही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमध्ये गरबा शिकण्यासाठी काही परदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. येथील गरबा क्लासेसमुळे आम्हाला नवी संस्कृती अनुभवता आली तसेच भारतात आल्यावर आनंद मिळतो अशी भावना ब्राझीलच्या गा जू याने देशदूत डिजिटलकडे व्यक्त केली आहे.

नाशिकमधील कौस्तुभ जोशी यांच्या के स्टुडिओ डान्स ऍण्ड एंटरटेनमेंट मध्ये गा जू सध्या गरब्याचे धडे घेत आहे. गा जू याच्यासह  कल्चर एक्सचेंज द्वारे सहा परदेशी पर्यटक गरबा शिकण्यासाठी काही दिवस आली आहेत.

आपली संस्कृती आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत, याबाबत असलेलं आकर्षण हा या मागचा मूळ उद्देश असल्याचे तयंनी सांगितले. गरब्यामध्ये नृत्य व सगीताबरोबर पोशाखही फार आकर्षक असतात त्यामुळे असा रंगेबिरंगी नवरात्री चा उत्सव हा परदेशी लोकांना खास आकर्षित करतो असे ते म्हणतात.

परदेशी विद्यार्थी किंवा पर्यटकांना गरबा शिकवणे आमच्यासाठी मोठे आव्हान होते. आमच्या क्लासचा हा पहिलाच अनुभव आहे. मला आनंद होतोय की मी आपली परंपरा आणि नृत्य संस्कृती त्यांना शिकवत आहे. त्यांची आकलन शक्ती ही इतरांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्यांना सांगितलेल्या स्टेप्स हे ते पटकन करून घेतात म्हणून काम अधिक सोपे असल्याचे कौस्तुभ सांगतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!